कॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव

0
169

 

गोवा खबर: कॉंग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर खुप मोठा जनाधार आहे. कॉंग्रेसच्या चारही अग्रणी संघटनानी आता जनसंपर्क वाढवुन पक्षाची ध्येय धोरणे लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. गोव्यातील कॉंग्रेसच्या चारही अग्रणी संघटना आता पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भूमीका बजावणार असे अखिल भारतीय कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव यांनी पक्षाच्या अग्रणी संघटनाबरोबर घेतलेल्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले.

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने वाढती महागाई, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, विधवा तसेच ज्येष्ठाना सरकारकडुन देण्यात येणाऱ्या मासीक अर्थसहाय्यात होणारा विलंब तसेच महिलांवरील अत्याचार असे विषय हातात घेवुन लोकांना न्याय देण्याची सुचना दिनेश राव यांनी केली.
युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोविडच्या महामारीत रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा तसेच इतर मदत देण्याच्या कामाता त्यानी गौरव केला व बेरोजगारी सारखे प्रश्न घेवुन भाजप सरकारला जाब विचारण्याचा सल्ला दिला. सरकारातील वाढता भ्रष्टाचार व गैरकृत्ये उघड करण्याची जबाबदारी युवक कॉंग्रेसने घ्यावी असे दिनेश राव म्हणाले.
कॉंग्रेसच्या विद्यार्थी विभाग असलेल्या एनएसयुआयला विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवितानाच, कोविड महामारीत कोलमडलेली शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारवर शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्यासाठी दबाव आणण्याचे आदेश दिनेश राव यांनी दिले.
सेवादल कार्यकर्त्यांनी लोकसेवा सुरूच ठेवावी असे सांगुन, जनहितानेच लोकांचा विश्वास संपादन करता येतो असे दिनेश राव म्हणाले.
लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी चारही अग्रणी संस्थानी कष्ट घ्यावेत असे सांगुन, संघटन प्रमुखानी आता विवीध मतदार संघात दौरे करावेत असे निर्देश दिनेश राव यांनी दिले.
येत्या १५ जुलै पुर्वी चारही अग्रणी संघटनांचे स्थानिक पातळीवर पुनरगठन होणे गरजेचे असल्याचे सांगुन, समाज माध्यम विभागही अधिक कार्यक्षम बनविण्याचे आदेश दिनेश राव यांनी दिले.
आजच्या बैठकीत कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, सेवादल प्रमुख शंकर किर्लपारकर, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी भाग घेतला व आगामी विधानसभा निवडणूकांच्या संदर्भात आपले विचार मांडले.
गोवा प्रभारी दिनेश राव पुढील दोन दिवसात गोव्याचा दौरा करणार असुन, पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत व अनेक मतदारसंघाना भेट देवुन गट समित्यांशी संवाद साधणार आहेत.