“केस्तांव दे कोफुंसाव “कोकणी सिनेमाच्या पोस्टरच थाटात प्रकाशन       

0
1480
गोवाखबर:राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये ऐन गणेशोत्सवात  प्रदर्शित होत असलेल्या केंस्ताव दे कोफुंसाव या कोकणी चित्रपटाच्या   पोस्टर प्रकाशन नुकत्याच कला अकादमीत पार पडलेल्या युवागिरी 2018  महोत्सवात मोठ्या जल्लोषात करण्यात आले. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते  पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी  इडीसीचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळयेकर, समाज कार्यकर्ते व सिनेमाचे सहनिर्माता रुपेश नारायण ठाणेकर, मार्केटिंग प्रमुख राहुल कामत व चित्रपटाच्या निर्मात्या सुचिता नार्वेकर उपस्थित होत्या.केस्ताव दे कोफुंसाव हा चित्रपट 100 टक्के गोमंतकीय कलाकारांना घेऊन बनवण्यात आला आहे.सिनेमाची कथा  गोव्यातील हिंदू आणी ख्रिश्चन कुटुंबावर आधारित आहे.चतुर्थी नंतर 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण गोव्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  कला चेतना वळवय च्या चेतना प्रोड्यकशन ची ही निर्मिती असून  “द नुट्रल व्हिवं ” व “गो गोवा गोलिवूड” निर्मिती साठी सहकार्य करत आहे.
  सिनेमाची कथा स्वतः सुचिता नार्वेकर यांची असून होम स्वीट होमचे यशस्वी दिग्दर्शक स्वप्नील शेटकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनची बाजू सांभाळली आहे.नामवंत गीतकार आणि संवाद लेखक साई पाणंदिकर यांनी  संवाद व गीत लेखन केल आहे. सिनेमाला  रोहन नाईक यांनी संगीत दिले आहे. कोकणी रंगभूमीवरचे सेंच्युरी किंग राजदीप नायक व तियात्र रंगमंच गाजवणारे अनिल पेडणेकर हे दोघे स्टार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याच्या सोबत रेश्मा नाईक, आतोनेत डिसोजा, स्पिरिट,गौरी कामत, अनिल रायकर, बंटी उडेलकर , प्रशांत म्हार्दोळकर ,  इथन  व चैतन्य सुजॉय  नाईक दोन हे बाल कलाकार असून या सर्व  कलाकारांनी सिनेमाची कथा जीवंत करून प्रेक्षकांसमोर मांडली आहे. या चित्रपटाची गाणी प्रसिद्ध तियात्र गायक फ्रांसिस दी तुये व प्रियांका रायकर यांनी गायली आहेत.या सिनेमाचा ट्रेलर 17 ऑगस्ट रोजी  प्रदर्शित होणार असून त्याला सुद्धा रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभेल अशी आशा निर्माती सुचिता नार्वेकर हिने व्यक्त केला आहे.