‘केस्तांव दी कोफुसांव’चा उद्या कला अकादमित भव्य प्रीमियर शो

0
1137
गोवा खबर:सुचिता नार्वेकर निर्मित आणि स्वप्निल शेटकर दिग्दर्शित कोकणी  ‘केस्तांव दी कोफुसांव’ या सिनेमाचा भव्य प्रीमियर शो उद्या सकाळी साडे दहा वाजता कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.प्रीमियर शो साठी प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक उपस्थित राहणार आहेत.
‘केस्तांव दी कोफुसांव’ हा सिनेमा 28 सप्टेंबर पासून राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.प्रेक्षकांनी आगाऊ तिकीटे बुक करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असल्याने उद्याच्या प्रीमियर शोची उत्सुकता सगळ्याना लागून राहिली आहे.
सुचिता नार्वेकर या धाडसी युवतीने या सिनेमाची कथा लिहीण्या बरोबरच निर्मितीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
‘केस्तांव दी कोफुसांव’ सिनेमात कोकणी नाटक आणि सिनेमाचा सुपरस्टार असलेला राजदीप नाईक प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे.याशिवाय प्रसिद्ध तियात्र कलाकार अनिल पेडणेकर,बंटी उंडेलकर,अनिल रायकर, अवधूत कामत,गौरी कामत,स्पिरिट फर्नांडिस आणि दोन बालकलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवतील यात शंका नाही.रोहन नाईक यांनी संगीत दिलेली गाणी पूर्वीच सोशल मीडियावर सुपर हिट झाली आहेत.संवाद आणि गीत लेखनाची जबाबदारी सिद्धहस्त गीतकार साई पाणंदीकर यांनी सांभाळली आहे.