केव्हेंटर्सचा गोव्यात प्रवेशः पुढील वर्षी वेगवान विस्ताराची योजना

0
1102

शहरात दोन आऊटलेट्सचे अनावरण आणि २०१९ च्या शेवटापर्यंत आणखी ११ पेक्षा अधिक आऊटलेट्स आणणार 

 

– आगामी वित्तीय वर्षासाठी १०० टक्के वाढीचा अंदाज आणि २०१९-२०साठी पुढील
वर्षापर्यंत या टक्केवारीच्या १०० टक्के आणि गोव्यातील आऊटलेट्समधून वार्षिक अधिक आऊटलेट्स आणणार

 

गोवा : केव्हेंटर्स हा भारतातील लोकप्रिय डेअरी ब्रँड अत्यंत उत्साहाने
सळसळत्या आणि उसळत्या गोवन बाजारपेठेत विस्ताराची घोषणा करण्यासाठी सज्ज
आहे. अलीकडील काळात, गोव्यामध्ये पणजी येथे एमजी रोडवर केव्हेंटर्सचे पहिले
आऊटलेट सुरू झाले असून बागामधील टिटोस लेनमध्ये दुसरे आऊटलेट सुरू झाले आहे.
विविध शीतपेयांच्या प्रकारांमध्ये खास आणि चविष्ट फ्लेवर्स उपलब्ध आहेत. त्यात घट्ट
शेक्स, क्लासिक शेक्स, फ्रूटी शेक्स आणि गरम पेये यांचा समावेश असून ही कंपनी
पुढील वर्षभरात शहरात ११ पेक्षा अधिक स्टोअर्स आणण्यासाठी सज्ज आहे आणि
गोव्याकडे ती या ब्रँडसाठी एक आघाडीची पाश्चिमात्य बाजारपेठ म्हणून पाहते. यात
उत्तरेकडील विविध ठिकाणांचा समावेश असेल जसे पणजी, कंडोलिम, कलंगुट, वागातोर,
विमानतळ आणि दक्षिणेकडील मडगाव, वास्को, मॉल्स (कॅनकुना, मॉल दे गोवा), पोर्वोरिम,
कोळवा. त्या पलीकडे या ब्रँड्सची शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स इत्यादींमध्ये दुकानेही
असतील.
२०१९ पर्यंत गोवा हे या ब्रँडसाठीच्या सर्वांत मोठ्या पाचव्या पोर्टफोलिओचे ठिकाण
असेल आणि ते दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्याशी स्पर्धा करेल. कंपनीच्या
किनारपट्टी प्रदेशांमध्ये व्याप्ती आणण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करून केव्हेंटर्स
गोवन बाजारपेठेच्या मोठ्या हिश्शावर भर देत आहे आणि पुढील वर्षभरात १०० टक्के
वाढ होईल असे अपेक्षित आहे. या विस्तारासोबत, हा ब्रँड गोवन बाजारपेठांमधून वार्षिक
पातळीवर कंपनीच्या महसुलात २५ कोटींची भर घालेल अशी अपेक्षा करत आहे आणि
त्यात कंपनीच्या मालकीच्या तसेच फ्रँचाइज केलेल्या आऊटलेट्सचाही समावेश आहे.
या विस्ताराबाबत केव्हेंटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आणि सहसंस्थापक श्री.
सोहराब सिताराम म्हणाले, केव्हेंटर्समध्ये आम्हाला भारताचा आवडता मिल्कशेक
गोव्यात आणताना खूप आनंद होत असून या प्रतिसादाबाबत आम्हाला खूप आनंद होत
आहे. गोव्यामध्ये वारसा, संस्कृती आणि कूलनेस यांचा एक सुरेख संगम आहे आणि तो

आमच्या ब्रँडशी सुसंगतही आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की, केव्हेंटर्समुळे गोवन
लोकांच्या आणि या राज्याला दर वर्षी भेट देणार्‍या लाखो पर्यटकांच्या मनात स्वतःचे
एक स्थान निर्माण होईल.
गोव्यामध्ये अलीकडेच दोन नवीन आऊटलेट्सची भर घातल्यामुळे केव्हेंटर्सची सध्या
भारतातील ३० ठिकाणी २४० पेक्षा अधिक आऊटलेट्स झाली आहेत. त्यात महत्त्वाची
शहरेही आहेत, जसे दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, लुधियाना, चंदीगढ,
चेन्नई इत्यादी. मागील वर्षीच या ब्रँडने आपले कार्य दुबई आणि नेपाळमध्येही सुरू
केले. केव्हेंटर्स या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी जगभरात ४०० पेक्षा अधिक
आऊटलेट्सचा रिटेल पाया दुप्पट करण्यासाठी कार्यरत आहे. पुढील दोन वर्षांच्या
काळात, या ब्रँडच्या भारतातील तसेच मध्यपूर्व, अमेरिका आणि आफिोतील महत्त्वाच्या
आणि पोहोच नसलेल्या ठिकाणांकडे व्याप्ती वाढवण्याच्याही योजना आहेत.
केव्हेंटर्सकडून आपल्या मेन्यूमध्ये अनेक आकर्षक उत्पादने दिली जातात. त्यात शेक्स
आणि प्री पॅकेज्ड खाद्यपदार्थ जसे पॉपकॉर्न, कुकीज हे सर्व अत्यंत खास आणि चविष्ट
स्वादांमध्ये उपलब्ध आहेत. गोव्यातील ग्राहकांना आता ब्रँडच्या चविष्ट उत्पादनांचा
आनंद घेता येईल. त्यात थिक मिंट ओरिओ क्रंबल, चॉकलेट ओरियो, टूटी फ्रूटी, केसर
बदाम मिल्कशेक यांचा समावेश आहे आणि त्याचबरोबर क्लासिक बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी,
कोल्ड कॉफी किंवा मँगो शेक्सही आवडतील. केव्हेंटर्सकडून लशियस ब्लूबेरी, अल्फोन्सो
मँगो शेक आणि एक्झॉटिक स्ट्रॉबेरी अशा प्रकारचे विविध शेक्स फळांच्या चाहत्यांसाठी
उपलब्ध आहेत. त्याचवेळी, गरम पेयांच्या मेन्यूमध्ये विविध प्रकारचे गरम मिल्कशेक
आहेत (बल्मी बनाना, क्रिमी चॉकलेट, सोलफुल सॉल्टेड कॅरेमल), चहा (ग्रीन टी, मसाला
मॅडनेस), स्पेशल हॉट शेक्स (केसर पिस्ता मिल्क, काश्मिरी कावा, चॉकलेट कम्फर्ट) आणि
गरम कॉफी (एस्प्रेसो, अमेरिकानो, कॅफे लाते, कपुचिनो.)
तुम्ही आता केव्हेंटर्स आऊटलेटला येथे भेट देऊ शकताः
पणजी पत्ताः संपर्क क्रमांकः तळमजला, ०३, दत्तप्रसाद बिल्डिंग, एमजी रोड, ओझरी, पणजी,
गोवा 403001 | 085309 25628
बागा पत्ताः संपर्क क्रमांकः दुकान क्रमांक २, घर क्रमांक ७, ७सी, टिटोस लेन, सॉन्टा वड्डो,
बागा, गोवा 403516 | 070280 82587