केरीत सर्पमित्र नाईक यांनी पकडला साडे दहा फुटाचा किंग कोब्रा

0
865

गोवा:सर्पमित्र विराज नाईक उर्फ वीरू यांनी केरी-सत्तरी हळीतवाडा येथे संदीप माजिक यांच्या घरा समोरील तुळशी वृन्दावनापाशी आलेला साडेदहा फूट लांबीचा किंग कोब्रा पकडून त्याची सुटका केली.हा किंग कोब्रा केरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर गिरीश बैलुडकर यांच्याकडे स्वाधीन केल्यावर त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.विराज नाईक यांनी यापूर्वी पाच किंग कोब्रा पकडले असून विर्डी दोडामार्ग येथे १६ फूट लांबीचा किंग कोब्रा पकडल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे.त्याचप्रमाणे विराज यांनी अनेक कोब्रा व अन्य विषारी,निमविषारी  व बिनविषारी साप पकडले आहेत. तसेच अनेक प्राण्यांना जीवदान दिले आहे.त्यांच्या या कामगिरीचे सगळीकडे कौतुक होत आहे.