केपे मतदार संघात सेवा सप्ताह निमित्त पंतप्रधानांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम

0
158
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिनी केपे भाजप मंडळ तर्फे विविध सेवाभावी कार्यक्रम केले गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते हे सर्व सेवाभावी कार्यक्रम करण्यात आले.
 
या कार्यक्रमांतर्गत आज फातर्पा व ईंग्रामळ केपे येथे जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सेंट मदर तेरेझा मिशिनरीज ऑफ चॅरिटी या सेवाभावी संस्थेत अन्न सेवेचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी ईंग्रामळ येथील सेंट जोसेफ हाऊस येथील जेष्ठ नागरिकांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे गाणे म्हटले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यासोबत फातर्पा येथील कार्यक्रमात केपे भाजप मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, भाजपचे अनुसूचित जमातीचे नेते प्रभाकर गांवकर, बाळळीचे पंच राजू गोसावी व अविनाश वेळीप, सुरेंद्र कामात उपस्थित होते. सेंट जोसेफ येथील सेवेदरम्यान उपमुख्यमंत्र्यांसोबत  केपेचे नगरसेवक फिलू डिकॉस्ता, विलियम फर्नांडिस, लुईझा कार्व्हालो, माजी नगराध्यक्ष कॅटी फर्नांडिस, बाळळीचे पंच राजू गोसावी व अविनाश वेळीप, गुरु गावस, पावलो फर्नांडिस आदी उपस्थित होते.
केपे नगरपालिका क्षेत्रामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सेवासप्ताह निमित्त रोपांचे वाटपही केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, उपनगराध्यक्ष चेतन हळदणकर, नगरसेवक फिलू डिकॉस्ता, लुईझा कार्व्हालो, माजी नगराध्यक्ष कॅटी फर्नांडिस, आंबवली सरपंच जशींता डायस, बाळळीचे पंच राजू गोसावी, पुष्पा नाईक, गुरु गावस, केपे भाजप मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, भाजपचे अनुसूचित जमातीचे नेते प्रभाकर गांवकर, केपे भाजप मंडळाचे सरचिटणीस प्रसाद फळदेसाई, राजू सुखटणकर, संदीप फळदेसाई, गणपत मोडक आदि उपस्थीत होते.
यावेळी आमोणा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयासमोर उपमुख्यमंत्र्यांनी रोपटे लावले व श्रमदान केले. २० तारखेपर्यंत चालणाऱ्या या सेवा सप्ताहात अजूनही सेवाभावी कार्यक्रम आखले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मा प्रधानमंतत्र्यांचा हा ७० वाढदिवस समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत सेवाभावाने पोचविण्यासाठीचा हा एक निर्मळ प्रयत्न  असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.