केपे नगरपालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन घरभाडे गोळा करणार 

0
291
गोवा खबर:केपे नगरपालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन घरभाडे गोळा करण्यासाठीच्या योजनेचा उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हे घरभाडे गोळा करण्यासाठी राज्य शहरी विकास प्राधिकरण व एक्सीस बँकेतर्फे अद्यावत पॉईंट ऑफ सेल मशीनचा वापर करण्यात येणार आहे.
लोकडाऊनच्या काळात घरभाडे गोळा करण्यासाठी नगरपालिकेत लोकांनी गर्दी करू नये यासाठी या अभिनव योजनेचा अवलंब करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री  कवळेकर यांनी यावेळी सांगितले. घरभाडे भरण्यासाठी यामुळे जनतेला सहजता होणार आहे. तसेच नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात ह्यामुळे मदत होणार आहे, असे उपमुख्यमंत्री शेवटी म्हणाले. यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, नगरसेवक व राज्य शहरी विकास प्राधिकरणाचे अधिकारी हुसेन मुजावर, एक्सीस बँकेचे अधिकारी, आदी उपस्थीत होते.