केपे तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी

0
419

गोवा खबर:उकडयाने जीव हैराण झालेला असताना पणजी वेधशाळेने दुपारी पावणे एक वाजता बुलेटिन जारी करून दक्षिण गोव्यातील केपे आणि काणकोण तालुक्यात पुढील तीन तासात एखाद दुसऱ्या ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे.त्यानुसार पाऊस पडला असल्याने उकडयाने हैराण लोकांना दिलासा मिळाला आहे.

केपे तालुक्यातील आंबावलीसह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे.केपे आणि काणकोण तालुक्यावर पावसाचे ढग जमले आहेत.हा पाऊस आंबा आणि काजू यांना मात्र मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.