गोवा खबर:केंद्र सरकारने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम अर्थात एलटीटीईवरील बंदी पाच वर्षांनी वाढवली आहे. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 च्या उपकलमांतर्गत ही बंदी घालण्यात आली असून ती त्वरित अंमलात येत आहे. या संबंधीचा अधिसूचना आज जारी करण्यात आली.
एलटीटीई संघटनेची भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवणारी हिंसक आणि विघातक कृत्य सुरुच असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. तसेच या संघटनेची भारतविरोधी भूमिका कायम असून त्यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.