केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांचे कोविडने निधन

0
351
गोवा खबर :बेळगावचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोविडमुळे निधन झाले आहे. अंगडी यांच्यावर गेले दोन आठवडे दिल्ली  उपचार सुरू होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक   यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे.

11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.