केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा स्वीकारला पदभार 

0
1676

गोवा खबर:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे.

या आधीच्या सरकारमध्ये गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचा कार्यभार होता.

मे 2014 पासून गडकरी लोकसभेचे खासदार आहेत. 1989 ते 2014 या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्रात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिले.