केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

0
961

 

 

गोवा खबर: केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. ५९ वर्षाच्या अनंत कुमार यांना कॅन्‍सर झाल्याने ते रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बेंगळूरूमध्ये त्‍यांनी अखरेचा श्वास घेतला. अनंत कुमार हे बेंगळूरूमधून सहा वेळा खासदार म्‍हणून निवडून आले होते.

अनंत कुमार यांना कर्करोगाचा आजार होता. त्यासाठी लंडनला जाऊनही त्यांनी उपचार घेतले होते. नुकतेच, गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर, बंगळुरू येथील श्री शंकर कँसर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच, संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटवरवरुन सितारमण यांनी हे वृत्त समजताच अतिशय दु:ख झाल्याचे सांगत अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.