केंद्रीय पथके करणार पूरबाधित राज्यांचा दौरा

0
1178

गोवा खबर:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १९ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानूसार केंद्रीय पथके पूरबाधित राज्यांचा दौरा करणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकांची नियुक्ती केली आहे. आसाम, मेघालय, त्रिपूरा, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यांना भेट देऊन ही पथकं पूरामुळे झालेल्या नूकसान आणि मदतकार्याचा आढावा घेतील.

तसेच राज्य सरकारांनी पुरामुळे झालेल्या हानीसाठी घेतलेल्या मदत आणि बचाव कार्याची पाहणी करुन अतिरिक्त निधीची मागणी केल्यास तसा अहवाल सादर करतील.