केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा पायाभरणी सोहळा

0
1075

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा पायाभरणी सोहळा पार पडला. याप्रसंगी बोलताना श्री नाईक म्हणाले की, या संस्थेमुळे आयुर्वेद डॉक्टरांच्या कौशल्यात आणखी वृद्धी होईल. त्यामुळे रुग्णांना परवडणाऱ्या दरांमध्ये उपचार उपलब्ध होतील.

सरिता विहार, नवी दिल्ली येथील या संस्थेत 500 लोकांची आसनक्षमता आहे. यात आयुष स्पोर्टस कॉम्प्लेक्स, औषधालय, केंद्रीय ग्रंथालय, पंचकर्म विभाग, आंतरराष्ट्रीय अतिथी गृह, निवासी संकुल, मुला-मुलींसाठी वस्तीगृह असणार आहे. या प्रकल्पासाठीचा एकूण खर्च 212.36 कोटी रुपये असणार आहे. 33 महिन्यांमध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे काम पूर्ण होणार आहे.