केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी कोविड पॉझिटीव्ह

0
633
गोवा खबर:केंद्रीय आयुष मंत्री आणि त्यांच्या पत्नीची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.नाईक यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.फारशी लक्षणे नसल्याने त्यांनी होम आइसोलेशनचा पर्याय निवडला आहे.

आज सकाळी नाईक यांच्या पत्नीची कोविड टेस्ट करण्यात आली होती.ती पॉझिटीव्ह आली.त्यानंतर नाईक यांनी आपला नियोजित दिल्ली दौरा रद्द करत आपल्यासह घरातील सगळ्यांची चाचणी करून घेतली. त्यात श्रीपाद नाईक पॉझिटीव्ह आढळून आले. घरातील एकूण 10 जणांची टेस्ट झाली त्यातील नाईक आणि त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.दोघांनाही होम आइसोलेशनचा पर्याय स्वीकारत आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे ट्वीट द्वारे कळवले आहे.