केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0
1094

 

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांच्या सापेंद्र, ओल्ड गोवा येथील निवासस्थानी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा, सभापती डॉ प्रमोद सावंत, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर यांची यानिमित्त उपस्थिती होती. श्रीपाद नाईक यांनी आयुषमंत्रालयाची जबाबदारी सांभाळल्यानंतर केलेल्या कामाचे कौतुक राज्यपालांनी यावेळी केले. आयुष मंत्रालयामुळेच योग आज जागतिक पातळीवर पोहचल्याचं त्या म्हणाल्या.

प्रसाद नेत्रालय, उड्डपी यांच्यातर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याशिवाय आयुर्वेदीक आणि होमिओपथी सल्ला आणि औषधवाटप करण्यात आले. मधुमेह तपासणी, कॅल्शिअम, हिमोग्लोबीन तपासणी (आयएमई-9 गोळ्यांसह) करण्यात आली. विविध खासगी निसर्गोपचार संस्थांनी योग प्रात्यक्षिके, उपचार याचे आयोजन केले होते.

गोवा सरकार, सांडू फार्मास्युटीकल्स, एमिल फार्मा, कुडोस लॅब, लीडजेन आयुर्वेद फार्मा, आयुर्वेद महाविद्यालय-शिरोडा, मुलतानी फार्मा, आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुषमान आरोग्य आणि समाज कल्याण संस्था यांच्या सहकार्याने विविध आरोग्य तपासणी आणि औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.