केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून अरविंद सावंत यांनी कार्यभार स्वीकारला 

0
1383

 

 

 गोवा खबर:केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून अरविंद सावंत यांनी आज नवी दिल्लीत कार्यभार स्वीकारला. देशातल्या रोजगार निर्मितीला अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रमाचे मोठे योगदान असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.

आपल्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या आजारी उद्योगांचा पुनर्विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन रोजगार निर्मिती हे सरकारचे मुख्य उदिृष्ट साध्य करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

अवजड उद्योग सचिव, सार्वजनिक उपक्रम सचिव सीमा बहुगुणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अरविंद सावंत यांचे स्वागत केले.