कॅसिनो ही काँग्रेसची देण-नाईक

0
1158

कॅसिनो ही काँग्रेसची देण आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीच्या पपर्श्वभूमिवर कॅसिनोच्या नावाने गळा काढण्याऐवजी आपल्या नेत्यांचा इतिहास तपासून पहावा,असा सल्ला भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी काँग्रेस नेत्यांना दिला. नाईक यांनी काँग्रेसच्या प्रचाराची खिल्ली उडवली.नाईक म्हणाले,काँग्रेसचे उमेदवार असलेल्या गिरीश चोडणकर यांनी कॅसिनोसमोर नौटंकी करण्या ऐवजी कॅसिनो कोणी आणले आणि गोव्याची संस्कृती कोणी बिघडवली याचा शोध घ्यावा.भाजप विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहे.मुख्यमंत्री असलेल्या पर्रिकर यांनी पणजी आणि सगळ्या राज्यसाठी काय केले आहे हे लोकांना माहित असल्याने विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी काही फरक पडणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.