कॅसिनो प्राईड ग्रुपतर्फे होली धमाका

0
956
गोवाखबर:कॅसिनो प्राईड ग्रुपतर्फे 2 ते 4 मार्च दरम्यान होली धमाका या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.होळी साजरी करण्यासाठी या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याला आतापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कॅसिनो प्राईड ग्रुपचे उपाध्यक्ष अमरजीत चावला यांनी सांगीतले.
होली धमाका मधील विजेत्यांना बंपर बक्षीसे दिली जाणार आहेत.पहिल्या विजेत्याला दुबईची 3 रात्री आणि 4 दिवसांची सैर करण्याची संधी मिळणार आहे.
दुसऱ्या विजेत्याला 3 रात्री आणि 4 दिवसांची काठमांडूची सैर करायला मिळणार आहे.तिसऱ्या विजेत्याला गोव्यात 2 रात्री आणि 3 दिवसांचा मुक्काम करून जीवाचा गोवा करता येणार आहे.
याशिवाय होली धमाका योजने दरम्यान रोज येणारे ग्राहक i Phone X जिंकू शकणार आहेत.कॅसिनो टेबलवर अनलिमिटेड ड्रिंक्स आणि स्नैक्स मिळणार असून विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.इच्छुकांनी आगवू नोंदणीसाठी 0832 6516666 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.