कॅसिनो प्राइडमध्ये थर्टीफर्स्टसाठी भरगच्च कार्यक्रम

0
2836
गोवा खबर:सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.हॉटेल्स आणि किनारी भागातील शॅकमध्ये संगीत पाटर्यांचे आयोजन करण्यात आले असून माहोल सेलिब्रिशनचा बनला आहे.
पणजीत मांडवी नदीतील कॅसिनोंमध्ये देखील बॉलीवुड सीताऱ्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पणजीतील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनो प्राइड 1 आणि प्राइड 2 मध्ये गोवन लोकनृत्या बरोबरच बॉलीवुड सितारे,गायक,नर्तक आपली कला पेश करणार आहेत.
यंदा प्रख्यात गायक सुखविंदर सिंग हा कॅसिनो प्राइड वरील कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे.त्याशिवाय बिग बॉस फेम सपना चौधरी आपल्या ठुमक्यांनी उपस्थितांना घायाळ करणार आहे. संकेत भोसले आपल्या मिमिक्रीने उपस्थितांची हसून पूरे वाट लावणार आहे.
कडेकोट पोलिस बंदोबस्त:पोलिस महासंचालक
ख्रिसमसपासून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.साध्या पोलिसां बरोबरच दहशतवाद विरोधी पथकाचे जवान ठीकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिली आहे.दरम्यान,जीवरक्षक कीनाऱ्यांवर समुद्र स्नानासाठी उतरणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवून आहेत