कॅसिनोंचा विषय पणजी पोटनिवडणुकीत तापणार,काँग्रेसची प्रचारास सुरवात

0
1051
  • कॅसिनोंचा विषय पणजी पोटनिवडणुकीत तापणार
    गोवा:पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॅसिनोंचा विषय चांगलाच तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी आपल्या प्रचाराची सुरवात आज मीरामार किनाऱ्यावर रुतुन बसलेल्या कॅसिनो जहाजाच्या समोरुन केली. पर्रिकर यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कॅसिनोंचे संकट पणजीवासीयांसमोर निर्माण झाले असून पर्रिकरांच्या सगळ्या चुका पणजीवासियांसमोर मांडून लोकांनी फसवणूक करणाऱ्या पर्रिकर यांची साथ सोडावी असे आवाहन चोडणकर यांनी यावेळी केले.
    दरम्यान कॅसिनोंमुळे पणजी मधील मांडवी नदी अपवित्र झाली असल्याचा दावा करत काँग्रेसच्या महिला आघाडीने फेरी धकक्यावर जाऊन मांडवी नदीची आरती करून मांडवीवरील कॅसिनोंचे अरिष्ट दूर होवो अशी प्रार्थना केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मीरामार येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,आमदार टोनी फर्नांडिस महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतींन्हो,जनार्दन भंडारी,सिद्धनाथ बुयाव आदि उपस्थित होते.