कॅबिनेट सल्लागार समितीला महिन्याची मुदतवाढ

0
924

गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्या गैरहजेरीत राज्याचा कारभार चालवण्यासाठी नेमलेल्या 3 मंत्र्यांच्या कॅबिनेट सल्लागार समितीला 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मुख्यमंत्री पर्रिकर यांनी उपचारासाठी अमेरिकेस जाण्यापूर्वी मगो,गोवा फॉरवर्ड आणि भाजपच्या प्रत्येकी एक याप्रमाणे 3 मंत्र्यांची कॅबिनेट सल्लागार समिती नेमुन त्यांना ठराविक रक्कमे पर्यंतचा निधी विकस कामांवर खर्च करण्याची मुभा दिली होती.या समितीची मुदत मार्च अखेर संपत होती.मुख्यमंत्री लवकर येण्याची चिन्हे दिसत नसल्याने समितीला पुन्हा किती मुदतवाढ मिळणार हा चर्चेचा विषय बनला होता.आज या समितीला 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.ही मुदतवाढ देताना समितीला आता 10 कोटी रूपयां पर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले.इतर मंत्र्यांच्या अधिकारात वाढ करून त्यांना आता 2 कोटी रूपयां पर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.दरम्यान मुदतवाढ मिळालेली कॅबिनेट सल्लागार समितीची बैठक आज होणार असून त्यात काय निर्णय घेतले जातात याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.