कॅप्टन दत्ताराम सावंत यांचे निधन

0
789
गोवा खबर:भारतीय लष्करातून निवृत्त झाल्यानतंरही समाजसेवेत सक्रिय असलेले पाळी – कोठंबी येथील कॅप्टन दत्ताराम सावंत  यांचे काल 18 फेब्रुवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले.ते 70 वर्षांचे होते.
पाळी – कोठंबी येथील स्मशानभूमित  त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र असा परिवार आहे.
त् 31 वर्षे 2 महिने लष्करात राहून कॅप्टन दत्ताराम सावंत यांनी देशाची सेवा केली होती. 1965 मध्ये पहिल्या भारत – पाक युद्धात ते सहभागी झाले होते. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अनुमतीने झालेल्या बोफर्स रणगाडयांच्या चाचणीचे ते साक्षीदार होते. 31 मे 1996 ला ते निवृत्त झाले मात्र सार्वजनिक क्षेत्रात त्यांचे काम सुरुच होते.