कृषी विधेयका विरोधात काँग्रेसचे उद्या चलो राजभवन आंदोलन

0
377
गोवा खबर : संसदेत मंजूर केलेली कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी गोव्यात काँग्रेस उद्या सोमवारी ‘चलो राजभवन’ आंदोलन करणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
देशव्यापीआंदोलनाचा भाग म्हणून  गोव्यात उद्या सोमवारी दुपारी ३.३० वा. ‘चलो राजभवन’ आंदोलन केले जाणार आहे. विधेयके मंजूर न करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे राज्यपालांना दिले जाणार आहे.आंदोलनाला नवीन गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव उपस्थित राहणार आहेत.