कृषी विधेयकांच्या मध्यमातून बळीराजाला बळ देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न:जावडेकर

0
223

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कष्टकरी शेतकर्‍यांचे सर्वंकष हित जपण्यासाठी मंजूर केलेली तीन विधेयके देशातील बळीराजाला मोठे बळ व आत्मविश्वास देणारी असून त्यातून शेतकऱ्यांना दुप्पट भाव व इतर अनेक प्रकारे फायदे होणार आहेत जे लोक विरोध करतात तो निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असून निरर्थक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चोडण येथे केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार केंद्रातील अनेक मंत्र्यांना राज्यात जाऊन शेतकरी बिल संदर्भात माहिती देणे व शेतकर्‍यांशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने जावडेकर शनिवारी गोव्यात दाखल झाले. सकाळी त्यांनी मये मतदार संघातील सुमारे 100प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधला.


चोडण शैक्षणिक सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.या वेळी कृषी मंत्री बाबू कवळेकर, आमदार प्रवीण झांट्ये,भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सतीश धोंड दयानंद कारबोटकर,तुळशीदास चोडणकर, मनीषा आमोणकर प्रेमानंद म्हांबरे ,शंकर चोडणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी या वेळी शेतकरी विधेयक व तिन्ही बिलां बाबत आपली भूमिका सविस्तर मांडताना त्यातील सर्व बारकावे तसेच शेतकरी हित याची अभ्यासपूर्ण माहिती दिली . जावडेकर यांनी काही शेतकर्‍यांशी व्यक्तिगत चर्चा केली व त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या.

कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात खर तर हा अजेंडा होता मात्र केवळ राजकीय विरोधासाठी निरर्थक विरोध होत असून पंजाब मध्ये विरोध होतोय तो राजकीय प्रेरित आहे. शेतकरी हा केंद्र बिंदू मानून सरकारने बळी राजाला मोठी उभारी देण्यासाठी या बिलाच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल घेतले आहे. त्यातून देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल करीत विरोध करणार्‍या विरोधकाकडे लक्ष देऊ नका , असे आवाहन करीत जावडेकर यांनी केंद्र सरकार व सारी जनता बळीराजाच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे आश्वासन दिले या बिलामुळे कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला मोठे स्थान देत त्यांना सर्व ती सुरक्षा देण्याची योजना आखलेली आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार राज्यातील हरित व धवल क्रांती घडवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी यावेळी स्वागतपर भाषणात केंद्राची भूमिका सांगितली.आमदार प्रवीण झांट्ये यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रेमानंद म्हांबरे यांनी केले . मंत्री जावडेकर यांनी शेतकर्‍यांच्या समस्या व शंका समजून घेतल्या व निरसन केले. प्रवीण झांट्ये यांनी आभार मानले.