कुलू येथून प्रवाशांची सुटका

0
960

गोवा खबर:हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुलू जवळ बियास नदीला पूर आला आहे. या पुरामुळे अडकलेल्या काही पर्यटकांची भारतीय हवाई दलाच्या चमुने सुखरूप सुटका केली.

23 सप्टेंबरला बियास नदीजवळ 19 जण अडकले असल्याची सूचना पश्चिम हवाई दलाच्या सरसावा इथल्या तळाला मिळाली. स्क्वार्डन लिडर विपुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाच्या चमुने हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांची सुटका केली.  तर आज या नदीजवळच अडकलेल्या दोन युवकांची सुटका करण्यात आली असून यांना भुंतार येथील हवाई तळावर पोहोचवण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी हवाई दलाचे पथक अद्याप भुंतार येथे आहे.