किया मोटर्सतर्फे गोवा मध्‍ये डिझाईन टूरदरम्‍यान जागतिक दर्जाच्‍या कार्सचे प्रदर्शन

0
1097

  

 

  • २०१९ च्या उत्तरार्धात किया SP2i भारतात सादर होणार, दमदा परफॉर्मन्स आणि जागतिक स्तराचा दर्जा
  • दर सहा महिन्यांनी नवीन गाडी सादर करून आपली उत्पादन यादी वाढवण्याची कियाची योजना
  • आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्‍ये नवीन ५३६ एकर निर्माण सुविधेचे बांधकाम झाले पूर्ण

गोवा खबर:किया मोटर्स, या जगातील ८व्या क्रमांकाच्या ऑटोमेकरने गोवामधील डिझाइन टूरमध्ये आपल्या दोन जागतिक दर्जाच्या गाड्या सादर केल्या. आता कंपनी आपली बहुप्रतिक्षित मिड एसयूव्ही SP2i २०१९ मध्ये सादर करण्यास सज्ज झाली आहे. या सादरीकरणासोबतच येत्या तीन वर्षात भारतातील आघाडीच्या ५ ऑटोमेकर्समध्ये स्थान मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. भारतात पहिली गाडी सादर केल्यानंतर दर सहा महिन्यांनी नवी गाडी सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवून किया २०२१ पर्यंत आपल्या उत्पादन यादीत किमान ५ गाड्या आणणार आहे.

२९ जानेवारी २०१९ रोजी किया मोटर्स इंडियाने आंध्र प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री. एन. चंद्राबाबू नायडू आणि श्री. शिन बोंगकिल, रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत यांच्या उपस्थितीत चाचणी कार्यान्वयनाला सुरूवात केली. या समारोहाला किया मोटर्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हान-वू पार्क आणि किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कूख्यून शिम उपस्थित होते. या समारंभात कियाने आपल्या भारतासाठीच्या पहिल्या कारचे केमॉफ्लॉज केलेले उत्पादन दाखवले- ही SP2i कार असून तिचे टेस्ट ड्राइव्ह श्री. एन. चंद्राबाबू नायडू यांनी किया मोटर्सच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत केले आणि कियाच्या भारतातील आगमनाबाबत आनंद व्यक्त करून ब्रँडच्या ‘पॉवर टू सरप्राइज’ या तत्वज्ञानाचा पुनरूच्चार केला.

 

किया मोटर्सने ऑक्टो एक्स्पो २०१८ मधून भारतात प्रवेश केला आणि SP2i सोबत जगभरात सादर होणाऱ्या आपल्या १६ गाड्या या प्रदर्शनात मांडल्या. आगामी SP2i ही गाडी कंपनीच्या अंनतपूर येथील कारखान्यात तयार होत आहे. २०१९ च्या उत्तरार्धात हे काम पूर्ण होईल आणि जागतिक स्तराचा दर्जा, अप्रतिम डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ही गाडी तयार होईल. या गाडीची प्रेरणा भारताकडून आणि ‘शक्तिशाली’ भारताचा चेहरा असलेल्या ‘रॉयल बंगाल टायगर’ कडून घेण्यात आलेली आहे. त्यातूनच या गाडीला कियाचे प्रसिद्ध आणि अतिशय अनोखे असे ‘टायगर नोझ ग्रील’ हे वैशिष्ट्य लाभले आहे. चीफ डिझाइन ऑफिसर श्री. पीटर सेचर यांनी हे डिझाइन केले आहे. ही गाडी खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्पोर्टी, स्टायलिश डिझाइनसह भारतीय ग्राहकाल जशी कार हवी अगदी तशीच ही आहे.

 

भव्य अशा ५३६ एकरांवर पसरलेल्या या कारखान्याची वार्षिक निर्मिती क्षमता ३००,००० हून अधिक गाड्यांची आहे.  तसेच, येथे ३००० प्रत्यक्ष आणि ७००० अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल असे अपेक्षित आहे. किया आणि तिच्या व्हेंडर भागीदारांनी २ बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केल्यामुळे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल आणि उच्च दर्जाचे स्थानिक उत्पादन कौशल्य विकसित होऊ शकेल. एकात्मिक ऑटोमोटिव्ह उत्पादन सुविधा असलेल्या नवीन अनंतपूर कारखान्यात अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान असून ३०० पेक्षा अधिक रोबो प्रेस, बॉडी आणि पेंट शॉप यांचे ऑटोमेशन करत आहेत. या कारखान्यात हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादनही शक्य आहे. या कारखान्यात रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अशा सर्वाधिक अद्ययावत जागतिक तंत्रज्ञानाचा समावेश असल्याबाबत कियाला खूप अभिमान वाटतो आणि कारखान्यात १०० टक्के पाणी रिसायकल होत असल्यामुळे पर्यावरण स्नेही क्षमताही अंगीकारण्यात आल्या आहेत. याशिवाय, या कारखान्यात पाच एकर प्रशिक्षण संस्था आहे. त्यात ऑटोमोबाइल्सच्या क्षेत्रातील बेसिक टेक्निकल कोर्स (बीटीसी) चालवला जातो. या अभ्यासक्रमामुळे कारखान्यात, फॅक्टरी फ्लोअरवर सुरूवात करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये देण्यात येतात. भारतीय बाजारपेठेतील प्रवेशामुळे कंपनीच्या कोरिया, स्लोवाकिया, चीन, अमेरिका आणि मेक्सिको यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

भारतीय बाजारपेठेत प्रवेश करताना दर सहा महिन्यांनी एक नवी गाडी बाजारात आणण्याची कियाची योजना आहे. यातून २०२१ पर्यंत किमान ५ गाड्या सादर केल्या जातील. ‘द पॉवर टू सरप्राइज’ या आपल्या जागतिक तत्त्वाला अनुसरून कियातर्फे अपेक्षेपलिकडचा अनुभव दिला जाणार आहे. भविष्यातील मोबिलिटी, डिझाइन, उत्पादन आणि क्षमता याचसोबत जागतिक दर्जाची गाड्यांची देखभाल आणि रिपेअर सेवा सुविधा देऊन भारतीय ग्राहकांना गाडी बाळगण्याचा सर्वोत्कृष्ट अनुभव देत देशात आपला पाया भक्कम करण्यावर कंपनी लक्ष केंद्रीत करत आहे. भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून किया मोटर्सने भारतात शक्तिशाली विक्री पश्‍चात सेवा आणि नेटवर्क विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते स्थापित करण्यासाठी किया मोटर्स इंडियाने एक मोबाइल वर्कशॉप तयार केले आहे. त्यात अद्ययावत उपकरणे आहेत आणि आजच्या तंत्रज्ञानस्नेही भारतीय ग्राहकांसाठी नियमित देखरेखीची कामे करण्यास ते सक्षम आहेत. ‘किया प्रॉमिस टू केअर’ या ग्राहक केंद्री ओळखीखाली संकल्पना करून कस्टमाइज केलेले हे वर्कशॉप सेवा नेटवर्कला पूरक ठरेल आणि भारतात कियाचा ग्राहकवर्ग वाढवेल.

 

२००८ पासून किया मोटर्स कॉर्पारेशनने आपल्या जागतिक विक्रीत दुपटीने वाढ केली आहे. मागील वर्षी कंपनीने २.८ दशलक्ष गाड्या विकल्या. २०२५ पर्यंत १६ इलेक्ट्रिकल व्हिईकल सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवून किया मोटर्स कॉर्पोरेशन येणाऱ्या पिढ्यांसाठी आपली पृथ्वी अधिक हरित आणि स्वच्छ करणार आहे. याच धर्तीवर किया मोटर्स इंडियाही अनंतपूर कारखान्यात हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हिईकल बनवण्यास बांधिल आहे. नुकताच कंपनीने आंध्र प्रदेशसोबत सामंजस्य करार करीत ‘पार्टनरशीप फॉर फ्युचर इको मोबिलिटी’साठी सहभाग नोंदवला आहे. यातून आंध्र प्रदेश सरकारला हायब्रिड, प्लग इन हायब्रिड आणि ईव्ही अशा ३ निरो कार्स दिल्या जाणार आहेत.

 

आजघडीला किया मोटर्स जगभरात दर्जेदार गाड्या म्हणून ओळखल्या जातात. कियाने इतर सर्व जागतिक ऑटोमोबाइल्स ब्रँड्सना मागे सारत सलग चार वर्षे जेडी पॉवरच्या इनिशिअल क्वॉलिटी स्टडीमध्ये अव्वल मान मिळवला आहे. हा दर्जा कायम राखण्यासाठी कंपनी भारतातील प्रतिभावंतांना प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम बनवत स्थानिक पातळीवर अव्वल दर्जाची निर्मिती करण्याचे आणि त्याचसोबत जागतिक दर्जा राखण्याचे लक्ष्य बाळगून आहे.

 

किया विविध जागतिक क्रिडा उपक्रम जसे फिफा वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये स्पोर्ट पार्टनर आहे. भारतातही लाखो क्रिडाप्रेमींना प्रोत्साहन देत कंपनी हा वारसा जपणार आहे. २०१८ मध्ये किया मोटर्स इंडियाने बेंगळुरु फुटबॉल क्लबशी भागीदारी केली. सध्या सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग २०१९ च्या हंगामापासून २०२१/२२ च्या हंगामापर्यंत ही भागीदार असेल. सध्या, ऑस्ट्रेलियन ओपन २०१९ साठी या ब्रँडने अधिकृत बॉलकिड्स म्हणून भारतातील आघाडीच्या १० टेनिसप्रेमींची निवड केली. या मुलांना प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती यांच्याकडून प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना मेलबर्नला पूर्ण खर्च प्रायोजित असलेल्या तीन आठवड्यांच्या सहलीवर पाठवले जाईल.