किनारी सुरक्षेसाठी कायद्यात तरतूद करण्याचा सरकारचा निर्णय, ४ सदस्यीय समिती करणार अभ्यास

0
954
गोवा:पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या पर्यटन हंगामात जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात जायचा प्लान आखत असाल तर सायंकाळी 7 नंतर समुद्रात पोहायची परवानगी मिळणार नाही याची खुणगाठ मनाशी पक्की बांधा.
गेल्या काही दिवसात रात्री-अपरात्री समुद्रात बुड़ुन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या उपस्थितित उच्चस्तरीय बैठक घेतली.त्यात सायंकाळी 7 नंतर पर्यटकांना पोहण्यासाठी समुद्रात उतरण्यास बंदी घालण्याबाबत सर्वाचे एकमत झाले.सायंकाळी जीवाचा गोवा करणारे काही पर्यटक मद्यपान करून समुद्रात उतरतात आणि बुड़ुन मरतात. त्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत चालले आहे.यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी सरकारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून कामाला लागणार आहे.
काही पर्यटक ग्रुप मध्ये स्वतःची वाहने घेऊन येतात.आणि किनाऱ्यांवर स्वतःच जेवण बनवतात.त्यामुळे किनाऱ्यावर गलिच्छ चित्र पहायला मिळते. यापुढे असे चित्र पहायला मिळणार नाही याची दक्षता पोलिस आणि पर्यटन खात्याची यंत्रणा घेणार आहे.
याशिवाय किनाऱ्यावर तैनात  दृष्टीच्या जीवरक्षकांची कामाची वेळ वाढवणे, अधिक पोलिस तैनात करणे, किनाऱ्यावर अन्न शिजवणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घालणे अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. किनाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे पोलिसांना अधिकार देण्यासाठी कायद्यात विशेष तरतूद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासाठी ४ सदस्यीय समिती अभ्यास करणार आहे.