कितीही छळ झाला, तरी हिंदु राष्ट्र येईपर्यंत सनातनचे साधक स्वस्थ बसणार नाहीत ! – अभय वर्तक

0
905
गोवाखबर: हिंदुत्वाला विरोध करणार्‍या चमूकडून खोटे आरोप करून सनातनची अपकीर्ती केली जात आहे. पद्धतशीरपणे या पुरोगाम्यांनी हा वैचारिक आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न केला. याच षड्यंत्राचा भाग म्हणून कोणतेही सबळ पुरावे नसतांना सनातनच्या निरपराध साधकांसह हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांखाली अटक करून त्यांचा छळ करण्यात आला आहे. असे कितीही प्रयत्न झाले, तरी हिंदु राष्ट्र स्थापन होण्यापासून रहाणार आहे. हिंदु राष्ट्र येईपर्यंत सनातनचा एकही साधक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या हेतूने ४ फेब्रुवारी या दिवशी श्री महारुद्र देवस्थान सभागृह, नवेवाडे, संभाजीनगर (वास्को) येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत  वर्तक यांनी पुरोगाम्यांचा आतंकवाद या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे  सत्यविजय नाईक यांचे हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा या विषयावर मार्गदर्शन झाले.
समितीच्या कार्याची ओळख समितीचे  हरेष कोरगावकर यांनी करून दिली.   वर्तक पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्माचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदुत्वावर गेली ४-५ वर्षे चर्चा होत आहे. एका बाजूने हिंदु राष्ट्र व्हावे, असे या देशातील मोठ्या वर्गाला वाटते. याचबरोबर एक छोटा वर्ग हिंदु धर्मावर चिखलफेक करत आहे. सनातन संस्थेवर हाच गट तुटून पडला. ‘पुुरोगाम्यांची हत्या, बॉम्बस्फोट करणारे म्हणजे सनानतवाले’, असा खोटा प्रसार या लोकांनी चालवला आहे. स्वत:लाच विचारवंत म्हणून घोषित करणारे प्रा. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश हे हिंदु धर्माच्या विरोधात गरळओक करत होते. अशांचे खरे स्वरूप सनातन संस्थेने सनदशीर मार्गाने उघड केले. याचा पोटशूळ निर्माण झाल्याने सनातनच्या साधकांचा छळ करण्यात आला. सनातनचा निरपराध साधक समीर गायकवाड यांना अटक करून १८ महिने त्यांचा छळ करण्यात आला. तज्ञ डॉक्टर असलेले दुसरे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनाही अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध एकही पुरावा सादर करता आला नाही. सनातनच्या साधकांना न्याय अवश्य मिळेल. त्याचबरोबर निरपराध साधकांचा छळ करणार्‍या दुर्जन पोलिसांना ईश्‍वर शिक्षा केल्याशिवाय रहाणार नाही. सनातनला गोवण्यासाठी तपास यंत्रणांनी कटकारस्थाने रचली. सनातनच्या आश्रमावर अनेक धाडी टाकल्या. सनातनला साहाय्य करणार्‍या हितचितंकांना घाबरवण्यात आले. सनातनला छळण्याचे काम काँगे्रस शासनाच्या काळात झाले आणि आता दुर्दैवाने हिदुत्वनिष्ठ शासन म्हणवणार्‍या भाजप शासनातही असेच चालूच आहे. असे कितीही प्रयत्न झाले, तरी हिंदु राष्ट्र व्हायचे रहाणार आहे. हिंदु राष्ट्र येण्यासाठी तसेच येणार्‍या भीषण काळाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने साधना, नामजप, देवाची भक्ती वाढवून धर्माचरण केले पाहिजे. संघटित झालेच पाहिजे. ईश्‍वरकृपेने हिंदु राष्ट्र येणारच आहे. आपण आपले योगदान म्हणून धर्म आणि राष्ट्र संस्थापनेच्या या कार्यात प्रतिदिन किमान १ घंटा दिला पाहिजे.’’  सत्यविजय नाईक म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी हिंदूंनी खारीचा नव्हे, तर हनुमंताचा वाटा देणे काळाची गरज आहे.’’ वास्को येथील कृतीशील धर्माभिमानी तथा छत्रपती शिवाजी स्वराज्य संघटनेचे  किरण नाईक यांचा  अभय वर्तक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  सावळो मडगावकर यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन कु. शांभवी वझे आणि कु. कल्पिता गडेकर यांनी केले. वक्त्यांच्या भाषणानंतर झालेल्या गटचर्र्चेत प्रत्येक आठवड्याला धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी उपस्थितांनी केली.