किटकॅट ट्रॅव्हल ब्रेक पॅक लाँच करण्यासाठी गोवा टुरिझम आणि नेस्ले इंडिया एकत्र – जीवरक्षक प्रशिक्षण उपक्रमाचेही लाँच

0
1402

 

 

 

 

ग्राहकांना त्यांच्या कंटाळवाण्या दिनक्रमातून ब्रेक घेण्याची प्रेरणा देणाऱ्या किट कॅटने नवा टिन ट्रॅव्हल ब्रेक पॅक लाँच केला आहे, ज्यात गोव्याची फारशा माहीत नसलेल्या पर्यटन ठिकाणांची झलक पाहायला मिळते. हे उत्पादन केवळ गोव्यात तयार होणार असून आज लाँचनंतर ते संपूर्ण भारतात उपलब्ध केले जाईल.

 

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून नेस्ले इंडिया देशभरात विशेषतः पोषण आरोग्य आणि स्वास्थ्य, पाणी व ग्रामीण विकास क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करत असून त्याद्वारे ‘आयुष्याचा दर्जा उंचावणे आणि अधिक निरोगी भविष्यासाठी योगदान देणे’ असा हेतू आहे.

 

किटकॅट ट्रॅव्हल ब्रेक पॅक व्यतिरिक्त नेस्ले इंडियाने संपूर्म गोवा राज्यात एक हजार जीवरक्षक, क्रुझ क्रु, समुद्रकिनारा सफाई कर्मचारी वर्ग आणि वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटर्सना प्रशिक्षण देण्यासाठी गोवा टुरिझम आणि दृष्टी यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

 

या दुहेरी उपक्रमाबद्दल श्री. निलेश काब्राल, अध्यक्ष, जीटीडीसी म्हणाले, ‘गोवा टुरिझम- किटकॅट ट्रॅव्हल ब्रेक पॅकसह दुहेरी उपक्रम लाँच करणाऱ्या नेस्ले इंडियाला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. याचे कारण गोवा हे सुट्टी घालवण्याचे एक लोकप्रिय ठिकाण आहे आणि व्यग्र दिनक्रमातून मोठा किंवा छोटा ब्रेक घेताना पर्यटक गोव्याचाच विचार करतात. त्याचप्रमाणे गोवा हे देशातील आघाडीचे किनारपट्टी पर्यटन ठिकाण आहे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. दरवर्षी गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेता समुद्रकिनाऱ्यांचे व्यवस्थापन हाताळणाऱ्यांची कौशल्ये आणखी विकसित करणे अतिशय महत्त्वाचे असते. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना येणारा अनुभव सुधारण्यासाठी नेस्ले इंडिया आणि दृष्टी हा उपक्रम हाती घेतल्याचा आम्हाला आनंद वाटतो.’

 

श्री. संजय खजुरिया, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॉर्पोरेट अफेयर्स, नेस्ले इंडिया म्हणाले, ‘नेस्ले इंडिया गेल्या दोन दशकांपासून गोव्यात कार्यरत असून येथील आमचे दोन कारखाने गोव्याशी असलेल्या बांधिलकीचे निदर्शक आहेत. आमच्या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून आम्ही आयुष्याचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अधिक निरोगी भविष्यासाठी योगदान देण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. गोव्यातील फेरीवाल्यांसाठी कौशल्य विकास उपक्रम हाती घेतल्यानंतर आम्ही जीवरक्षक, क्रुझ क्रु, किनारपट्टी स्वच्छता कर्मचारी आणि वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटर्स यांना प्रशिक्षण देणार आहोत. त्यासाठी आमच्यासोबत सहयोग करण्याबद्दल आम्ही गोवा टुरिझम आणि दृष्टीचे आभारी आहोत.’

 

किटकॅट ट्रॅव्हल ब्रेक पॅक लाँच करण्याबद्दल ते म्हणाले, ‘किटकॅटची पंचलाइन, हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट गोवासारख्या ‘लँड ऑफ ब्रेक्स’शी सुसंगत आहे. आम्हाला खात्री वाटते, की हा उपक्रम गोव्यातील फारशा माहीत नसलेल्या ठिकाणांबद्दल जनजागृती करेल.’

 

अधिक माहितीसाठी संपर्क

दीपक नार्वेकर

वरिष्ठ व्यवस्थापन (विपणन) पीआरओ

गोवा पर्यटन विकास महामंडळ लि.

पर्यटन भवन, तिसरा मजला,

पाटो, पणजी- गोवा, इंडिया

संकेतस्थळ -goa-tourism.com
ईमेल-gtdcpro@gmail.com/ pro@goa-tourism.com
मोबाइल-09422847166, फोन: +91832249410 फॅक्स: +918322437433
https://www.facebook.com/officialgoatourism

किंवा

 

अंम्ब्रीन अली शाह, नेस्ले इंडिया, +91 9717022731

शशांक कुमार नायर, नेस्ले इंडिया, + 91 9818077775

नेस्ले इंडिया लिमिटेड, मुख्य कार्यालय, नेस्ले हाउस, जॅकरंडा मार्ग, एम ब्लॉक, डीएलएफ सिटी फेज – दुसरी, गुरुग्राम 122 002 (हरियाणा)

फोन: +91-124-3321824/1275, फॅक्स: +91-124-2389381

नोंदणीकृत कार्यालय: 100 / 101, वर्ल्ड ट्रेडस सेंटर, बाराखंबा लेन, नवी दिल्ली – 110001

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर: L15202DL1959PLC003786

ईमेल आयडी: ambereen.shah@in.nestle.com / shashank.nair@in.nestle.com  (किंवा सीसी करा media.india@in.nestle.com); investor@in.nestle.com

संकेतस्थळ: www.nestle.in