काॅंग्रेस पक्षाला कौल दिल्यास डाॅ. जॅक सिक्वेरांचा पुतळा विधानसभा संकुलातच उभा करणार: कामत

0
571
 गोवा खबर: डाॅ. जॅक सिक्वेरा यांचे गोव्याची अस्मिता टिकवुन ठेवण्यासाठी बहुमूल्य असे योगदान असुन, ओपिनीयन पोलच्या वेळी त्यानी दिलेले योगदान कुणीही विसरु शकत नाही. डाॅ. जॅक सिक्वेरा तसेच गोव्यासाठी योगदान दिलेल्या महान गोमंतकीयांचा सर्वच गोमंतकीयाना सार्थ अभिमान असुन, नियमाना बगल देऊन व बेकायदेशीर कृत्य करुन  त्यांच्या प्रतिभेचा व कार्याचा  राजकीय स्वार्थासाठी लाभ उठविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डाॅ. जॅक सिक्वेरा सारख्या महान गोमंतकीयांचा अपमान करण्यासारखेच आहे असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी दाल्गादो पुरस्कार २०१९ च्या वितरण सोहळ्यात बोलताना काढले.
आगामी काळात गोमंतकीयानी काॅंग्रेस पक्षाला कौल दिल्यास डाॅ. जॅक सिक्वेरांचा पुतळा विधानसभा संकुलातच उभा करण्याचे प्रतिपादन दिगंबर कामत यानी यावेळी बोलताना केले.
गोव्याचे कोंकणी साहित्य व कोंकणी भाषेच्या विकासासाठी दाल्गादो कोंकणी अकादमी अखंडीतपणे कार्य करत असुन, दाल्गाद पुरस्काराला आज एक वेगळे स्थान व प्रतिष्टा प्राप्त झाली असुन, सदर पुरस्कार मिळवणाऱ्या प्रतिभावंताना सदर पुरस्काराबद्दल अभिमान वाटतो असे उद्घार विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी पुढे बोलताना काढले.

दाल्गादो कोंकणी अकादमी तसेच तियात्र यासाठी आपल्यापरीने यापुढेही सर्व सहकार्य देण्याचे तसेच अकादमीसाठी वाचनालय उभे करण्यास जागा मिळवुन देण्यास प्रयत्न करण्याचे वचन दिगंबर कामत यानी उपस्थिताना दिले.
सत्करामुर्तींचा सत्कार होत असताना त्यांच्यावर मानाची छत्री धरुन उभे असलेल्या ज्येष्ट गोमंतकीय एलिजाबेथ यांचा दिगंबर कामत यानी खास उल्लेख केला व कला व कलाकाराला कसा  मान द्यावा हे  तरुणानी त्यांच्याकडुन शिकावे असे भावपुर्ण उद्गार काढले. गोमंतकीय गायक ओलव यांच्याबरोबर “आम्ही गोंयकार” कोंकणी गीताच्या काही ओळी गाऊन दिगंबर कामत यानी त्यांचा ही  गौरव केला.
दाल्गादो कोंकणी अकादमीचे अध्यक्ष तोमाझीन कार्दोज यानी यावेळी बोलताना दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना दाल्गादो कोंकणी अकादमीला अर्थसंकल्पीय तरतुद करुन सरकारी अनुदान मिळण्यास सुरूवात झाल्याचे सांगीतले व रोमी कोंकणीसाठी भरघोस मदत व सहकार्य करणारे ते एकमेव मु्ख्यमंत्री होते असे प्रतिपादन केले. विरोधीपक्ष नेते म्हणुन त्यानी सरकारकडे दाल्गादो कोंकणी अकादमीसाठी वाचनालयासाठी जागा उपलब्द करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी तोमाझीन कार्दोज यानी केली तसेच साहित्य अकादमी पुरस्कारात रोमी कोंकणी साहित्याचा समावेश करण्यासाठी कामत यानी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
दाल्गादचे उपाध्यक्ष फादर कोसेंसाव डिसील्वा यानी स्वागत केले. सोनिया गोम्स, आफोंसो ब्रागांझा, मेथ्यु डिकाॅस्ता, आयरिन कार्दोजो, आल्वारो गोम्स, वासाल्हो कार्वाल्हो व मिनीनो आल्मेदा यानी मानपत्रांचे वाचन केले.
प्रमुख पाहुणे दिगंबर कामत यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व स्मृतिचीन्ह देऊन इजिदोर दांतास, आर.बि.एस कोमरपंत, केनेथ झुजार्त, रामानंद रायकर, ओरेलियो व्हिएगस, सुकुर रिबेलो व ब्रेंडा मिनेझीस यांचा विवीध क्षेत्रातील योगदानासाठी गौरव करण्यात आला.
सत्कारमुर्तींतर्फे इजिदोर दांतास यानी सत्काराला उत्तर देणारे भाषण केले. विन्सी काद्रुज यानी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॅनियल डिसोजा यानी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवराना ब्रास बॅंडच्या वादनासह मंचावर आणण्यात आले. आजच्या कार्यक्रमास डाॅ. हरिश्चंद्र नागवेकर, प्रेमानंद लोटलीकर, पंढरिनाथ लोटलीकर, फादर मान्युएल गोम्स, विशाल पै काकोडे, सि.डी. सिल्वा, जॅसी डायस, बॅटी नाझ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.