कार्निव्हल अधिच किंग मोमोची राजवट

0
1378
 गोवा खबर:कार्निव्हल आला की गोव्यात किंग मोमोची राजवट सुरु होते..खा, प्या,मजा करा असा संदेश देणाऱ्या किंग मोमो उद्या पणजीत अवतरणार असला तरी त्याच्या संदेशाची अंमलबजावणी पणजीत वाइन फेस्टिव्हल पासून सुरु झाली आहे.
पणजी येथील बांदोडकर मैदानावर देशातील सर्वात मोठ्या वाइन फेस्टिव्हलला काल रात्री सुरुवात झाली.
ताल धरायला लावणारे संगीत,चमचमीत खाद्यपदार्थ आणि लज्जत वाढवणारी वाइन यांचा मिलाफ वाइन फेस्टिव्हल मध्ये पहायला मिळत आहे.
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते काल रात्री वाइन फेस्टिव्हलचे उद्धाटन झाले.फेस्टिव्हल मध्ये देश विदेशातील नामांकीत ब्रैंडच्या वाइन उपलब्ध आहेत.वाइनची चव कशी चाखायची याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देखील आज पासून दिले जाणार आहे.द्राक्षा शिवाय विविध देशी फळांपासून बनवलेल्या वाइन्स सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.
गोवन फिश करी,तिसऱ्याचे सुके, रशेद बांगडा, किंग फिश फ़्राय,चिकन तंदूर,चिकन टिकका,चिकन काफ्रीयाल सारख्या खाद्यपदार्थांच्या वासामुळे वातावरणात वेगळीच नशा पसरत आहे.रविवार पर्यंत हा फेस्टिव्हल चालणार असून उद्या कार्निव्हलच्या पार्श्वभूमीवर पर्यटक मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे.