कारागीर परीक्षांचा निकाल जाहीर   

0
988

गोवा खबर : कौशल्य विकास आणि उद्देजकता संचालनालयाने  प्रशिक्षण योजनेखाली नोव्हेंबर २०२० मध्ये घेतलेल्या कारागिर परीक्षांचा (Annual system OMR Based year-I, Batch 2018-2019- Ex-failed and Regular Trainees)  year-II (Batch-2018-2020- Regular Trainees) निकाल परीक्षा मंडळाने जाहीर केला आहे. उत्तीर्ण उमेदवारांच्या आसन क्रमांकाची यादी संबंधित आय.टी.आय. केंद्राच्या माहिती फलकावर मांडण्यात आली आहे.

गुणांची फेरतपासणी करण्यासाठीचे अर्ज ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संबंधित आयटीआय केंद्रांत सुपूर्द केले पाहिजे आणि असे अर्ज आयटीआय केंद्रांना १०  फेब्रुवारी  २०२१ पर्यंत परीक्षा विभागाला पाठविले पाहिजे. उशीरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.