कारवारचे आमदार एसआयटीपुढे गैरहजर

0
877

गोवाखबर:खाण घोटाळा प्रकरणीविशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावल्या नंतर  देखील कारवारचे आमदार सतीश सैल काल एसआयटीच्या कार्यालयात ऊपस्थित राहिले  नाहीत. पूर्वनियोजित कामांमुळे आपण एसआयटीपुढे उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी एसआयटीच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे. याप्रकरणात आपण पथकाला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपले नातेवाईक आजारी असल्याने आपल्याला नंतर येण्याची मुभा देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी एसआयटीला पाठवलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान, एसआयटीकडून सैल यांना शुक्रवारी कार्यालयातहजर राहण्याबाबत समन्स पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.