कामुर्लीत भाजपतर्फे गरजूंना मास्क आणि औषधांचे वाटप

0
21
गोवा खबर : कुडतरी भाजपा मंडळाने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल सेवा ही संघटन उपक्रमा अंतर्गत कामुर्ली ग्रामपंचाय क्षेत्रामधील गरजू लोकांना मोफत एन 95 मास्क आणि औषधांचे वाटप केले. त्याचबरोबर कोविडमधून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी याबद्दल जनजागृती केली.
यावेळी कामुर्लीचे सरपंच बासिल फर्नांडीस, पंच सदस्य संजना, कुडतरी भाजप मंडळ अध्यक्ष मयूर कुडचडकर, राज्य महिला मोर्चाच्या सचिव डॉ. स्नेहा भागवत, भावेश जांबावलीकर, अँथनी बार्बोसा आणि अवधूत उपस्थित होते.
मडगाव पालिकेच्या प्रभाग 24 मध्ये नगरसेविका सुनीता पराडकर, मंडळ सचिव सचिन पै, योगेश खांडेपारकर आणि योगेश वागळे यांच्या उपस्थितीत एन 95 मास्क आणि औषधांचे गरजूंना वाटप करण्यात आले.