कापूस निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्के वाढ होण्याची शक्यता

0
949

 

गोवा खबर:चालू कापूस हंगामात ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 या अवधीत भारताच्या कापूस निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्के वाढ होण्याची शक्यता कापूस सल्लागार मंडळाने व्यक्त केली आहे. या वाढीसह सप्टेंबर 2018 पर्यंत कापसाची निर्यात 70 लाख गासड्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2017 ते एप्रिल 2018 या अवधीत भारतातील 51.21 लाख गासड्या कापसाची निर्यात करण्यात आली. चालू हंगामात 370 लाख गासड्या इतके कापूस उत्पादक होण्याची शक्यता कापूस सल्लागार मंडळाने व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दलाच्या तुलनेत देशात कापसाचे दर सध्या कमी आहेत अशी माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामटा यांनी आज राज्यसभेत दिली.