कागदी पिशव्या बनविण्याविषयी कार्यशाळा

0
991

गोवा खबर: वस्तूसंग्रहालने 31 ऑगस्ट 2018 रोजी दु. 2ते संध्या. 4.30 वाजेपर्यंत गोवा वस्तूसंग्रहालयात (आदिलशहा पॅलेस) कागदी पिशव्या बनविण्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

 प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अधिकाधिक 25 प्रवेशिका स्वीकारल्या जातील. आपले नाव नोंदविण्यासाठी (0832)2434406/2436006 या क्रमांकावर संपर्क साधावा. नोंदणीची शेवटची तारीख 28 ऑगस्ट, 2018 आहे. उशीरा पोचलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.