कांदोळीत ३ कोटींच्या ड्रग्स नायजेरियनास अटक !

0
1001
 गोवा खबर :उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या  कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ आलेक्स याला अटक करून सुमारे ३ कोटींचे ड्रग्स जप्त केले. यात कोकेन, एमडीएमए, अँफेटॅमिन, चरस, गांजा व रोख २ लाख रूपयांचा समावेश आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. 
उत्तर गोव्याचे पोलिस अधिक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज २९ रोजी सीमेर-कांदोळी येथे संशयित राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत कळंगुट पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी उर्फ आलेक्स (३४) याला अटक  करून त्याच्याकडून १.०२१ किलो कोकेन, २.०३५ किलो एमडीएमए, ७६० ग्रॅम अँफेटॅमिन,  १०६ ग्रॅम चरस, १. २७० किलो गांजासह रोख २ लाख जप्त केले. हस्तगत केलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ३ कोटी आहे. संशयित आलेक्सला सध्या  पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी २०११ साली संशयिताला राज्यात अवैधरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच २०१२ मध्ये कळंगुट पोलिसांनी कोकेनप्रकरणात त्याला अटक केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
संशयित हा गेली कित्येक वर्षापासून गोव्यात राहत आहे. 2011 साली त्याला बेकायदेशीर गोव्यात राहत असल्याच्या कारणावरून अटक केली होती. त्यात त्याला शिक्षाही झाली होती. नंतर 2012 साली त्याला एनडीपीएस कायद्याखाली अटक केली होती. त्याच्याकडून 3 ग्राम कोकीन जप्त करण्यात आला होता. या तक्रारीत संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गोव्यात असलेले नायजेरियन हे ड्रग्ज व्यवसायात गुंतलेले आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, महिला उपनिरीक्षक प्रगती मलीक, पोलीस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, शंशाक साखळकर, महाबळेश्वर सावंत, सुरेश नाईक, स्मीतल बांदेकर, संज्योत केरकर, गोविंद फटनिक, राजेश पार्सेकर, मनोज नाईक, महेंद्र च्यारी, बाबुसो साळगावकर, योगेश खोलकर, लक्ष्मण मांद्रेकर, दिनेश मोरजकर, शैलेश गडेकर यांनी यात भाग घेतला.
 एनडीपीसी २१ (सी), २२ (सी), २० (बी) (), २० (बी)(ए) याच्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
पुढील तपास पोलीस अधीक्षक उत्किृष्ट प्रसून, पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलीस करीत आहेत.

जे नायजेरीयन जामिनावर सुटुन गोव्यात राहत आहेत त्यांच्यावर आता पोलीस कडक लक्ष ठेवून असणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. संशयित नाजायजेरियनाकडे सापडलेला ड्रग्ज कुठून आला होता याचाही पोलीस तपास करणार आहेत. किनारी पट्टयातून ड्रग्ज व्यवसायाची पाळेमुळे उपटून काढण्यासाठी पोलीस कार्यरत असणार असल्याचे उत्कृष्ट प्रसन्नू यांनी सांगितले.

गेल्याच आठवडयात १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री कळंगुट व साळगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून तिघा नायजेरियन नागरिकांना १.५४ लाखाच्या अमली पदार्थांच्या मुद्देमालसह अटक केली. सुमारे १२ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी संशयितांना साळगाव येथे अटक केली. यात दोघे पोलीस किरकोळ जखमी झाले. यामध्ये किनारी पट्ट्यातील कुख्यात ड्रग डिलर मायकल ओकाफोर याला अटक  केली होती.