कांदोळीत ड्रग्स प्रकरणात दोघा नायजेरियनांना अटक

0
876

गोवा:कळंगुट पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या ड्रग्स विरोधातील कारवाई मध्ये दोघा नायजेरियनांना अटक केली. त्यांच्याकडून 15 हजार रूपयांचा गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
कळंगुट पोलिसांना खात्रीशीर सुत्रांकडून मायकल ओकोरो आणि अदेलेके खलीद हे दोघे कांदोळी येथील अरीश शॅक मध्ये ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यानंतर कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेेमून दोन्ही नायजेरियनांना 15 हजार रूपयांच्या गांजासह अटक करण्यात आली.या कारवाई मध्ये पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर,विद्येश पिळगावकर,महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस,करिश्मा परुळेकर,पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर,अमीर नाईक, संज्योत केरकर आणि कर्मचारी सहभागी झाले होते.दोघाही नायजेरियनांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही नायजेरीयनांकडे अधिकृत पासपोर्ट व इतर कागदपत्रे नसल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे कायदेशीर कागदपत्रांशिवाय वास्तव्य करत असल्याबद्दल दोघांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कळंगुट पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई करत एका नायजेरियनास अटक केली होती.