काँग्रेस उपाध्यक्ष मुल्ला गोवा फॉरवर्ड मध्ये दाखल

0
980

काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि मुस्लिम समाजाचे नेते अकबर मुल्ला यांनी आज गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. गोवा फॉरवर्डच्या पणजी येथील मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितित मुल्ला यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.यावेळी गोवा फॉरवर्डचे मंत्री जयेश साळगावकर,विनोद पालयेकर,माजी आमदार बाबुश मोन्सेरात,ट्रोजन डिमेलो उपस्थित होते.काँग्रेसने आपल्याला केवळ वापरून घेतले.मुस्लिमांना काँग्रेसने दुर्लक्षित ठेवले.आपल्यावर देखील अन्याय झाला.काँग्रेसच्या कारभाराला आमदार सुद्धा कंटाळले असून पाच वर्षानंतर काँग्रेस सोबत फक्त 5 आमदार राहतील अशी टिका मुल्ला यांनी केली. वाळपई आणि पणजी मधील मुस्लिमांनी विश्वजीत राणे आणि मनोहर पर्रिकर यांना मतदान करावे असे आवाहन मुल्ला यांनी यावेळी केले.