काँग्रेसने 21 आमदारांची नावे जाहीर करावीत:नाईक

0
1045
गोवा खबर:काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी किती आमदार आहेत त्यांची नावे जाहिर करावीत.केवळ पोकळ दावे करून जनतेची दिशाभूल करु नये,अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी व्यक्त केली आहे.
भाजप आघाडी अभेद्य असून काँग्रेसने आघाडी मधून फुटून कोणी काँग्रेसला सरकार बनवण्यास मदत करतील याची स्वप्ने सुद्धा बघू नये असा सल्ला नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिला आहे.