काँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवू नये-भाजप

0
986

पणजी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस मधील आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी स्मार्ट सिटी पणजी बाबत केलेल्या विधानांचा समाचार आज भाजपने घेतला.पणजी स्मार्ट सिटी होउ शकत नाही,पणजीत साधन सुविधा उभारणे शक्य होणार नाही.ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप नाईक यांनी केला होता.त्यावर नाईक यांनी स्मार्ट सिटी बाबत बेताल वक्तव्य करण्यापूर्वी स्मार्ट होऊन स्मार्ट सिटी प्रकल्पा अंर्तगत सुरु असलेली कामे आणि केंद्र सरकार कडून आलेला निधी माहित करून घ्यावा असा सल्ला पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी दिला.पणजीत स्मार्ट सिटी बाबत नकारघंटा वाजवणाऱ्या काँग्रेसने कर्नाटक मधील आपले नेते तेथील शहरे स्मार्ट सिटी मध्ये यावीत यासाठी कसे प्रयत्न करत आहेत हे जाणून घ्या आणि डबल ढोलकी वाली भूमिका घेणे बंद करा असे कुंकळ्येकर म्हणाले.दत्तप्रसाद नाईक यांनी काँग्रेसच्या रवी नाईक, लुईझीन फालेरो यांनी गोव्यात कॅसिनो आणले असा आरोप करत ज्या गोपाळ कांडाच्या कॅसिनो वरुन काँग्रेसवाले बोवाळ करत आहेत तो कॅसिनो काँग्रेसच्या राजवटी मध्ये परवानगी मिळालेला असून गोपाळ कांडा हा काँग्रेसच्या सरकार मध्ये गृहमंत्री होता याची आठवण नाईक यांनी करून दिली.