काँग्रेसच्या निवडणूक अपिलाचे पणजीत प्रकाशन

0
1062

काँग्रेसचे पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्या निवडणूक अपिलाचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.त्याशिवाय एका ऑडियो प्रचार गाण्याचे लॉन्चिंग माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले.मनोहर पर्रिकर हे 23 वर्षे पणजीच्या विकसात अपयशी ठरल्यामुळे मनोहर पर्रिकर यांना पणजी मधील प्रश्न जाणून घेण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे.पणजीची जनता हे सगळे जाणून असल्याने ही निवडणूक निर्णायक ठरेल असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पर्रिकर यांची अत्याचारी धोरणे लोकांसमोर उघड़ी करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाईक स्पष्ट केले.यावेळी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,माजी प्रदेशाध्यक्ष लुईझीन फालेरो,नीलकंठ हर्ळणकर,सिद्धनाथ बुयांव,जनार्दन भंडारी आदी पदाधिकारी उपस्थित होते