काँग्रेसच्या उपवासाला भाजपचे धरणे आंदोलनाने उत्तर

0
2106

गोवाखबर:काँग्रेसने देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारावर दुख व्यक्त करण्यासाठी केलेल्या उपवास कार्यक्रमाला भाजपने संसद ठप्प केल्याचा निषेध म्हणून काँग्रेस विरोधात धरणे आंदोलन करून उत्तर दिले.
कांग्रेस व इतर घटक पक्षांनी मागील 23 दिवस संसदेत केंदातील भाजप सरकारला व्यवस्थित कामकाज करु दिले नाही. त्याचा निषेध म्हणून काल  पणजी येथील आझाद मैदानावर भाजपच्या तिन्ही खासदारां­नी उपोषण केले. भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, माजी मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
 काँगेसने व इतर घटक पक्षांनी लोकशाहीची विटंबणा करुन लोकशाहीचा खून केला आहे, असा आरोप यावेळी वक्त्यांकडून करण्यात आला. कांग्रेसच्या या कृत्याचा निषेध म्हणून पंतप्रधान तसेच सर्व भाजप मंत्री, खासदारांनी काल दिवसभर देशभर उपोषण केले, असे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पुढे सांगितले.
कॉंगेस पक्षाचा सर्व राज्यांमध्ये पराभव होत आहे. भाजपचा विजयरथ अडविणे त्यांना शक्य नसल्याने ते आता संसदेचे कामकाज अडवून जनतेचे व देशाचे मोठे नुकसान करत आहेत. लोकसभेत व राज्यसभेत लोकांच्या विषयावर महत्वाची चर्चा होत असते. अशी वेळ काँगेसने यावेळी फुकट घालविली आहे. काँग्रेसला जर खरेच जनतेचे हीत पहायचे असते, तर त्यांनी संसदेत जनतेच्या कल्याणाच्या वेगवेगळे मुद्दे उपस्थित करुन त्यावर चर्चा घडवून आणली असती. मात्र काँग्रेसला कधीच जनतेचे काहीच पडलेले नसते, अशी  टीका भाजप प्रदेशाध्यश तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी केली.
 खासदारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा, विश्वजित राणे, पांडुरंग मडकईकर, एलिना साल्ढाण, आमदार नीलेश काब्राल, राजेश पाटणेकर, ग्लेन टिकलो, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सिद्धार्थ कुंकळेकर, दयानंद मांदेकर, राजेंद आर्लेकर, महादेव नाईक, दामू नाईक, तसेच सर्व आजी माजी मंत्री आमदार राज्यभरातील भाजपचे कार्यतकर्ते मोठय़ा संख्येने यावेळी आझाद मैदानावर उपस्थित होते.
महिला काँग्रेस कडून भाजपवर हल्लाबोल
राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपमधील तीन खासदारांना आझाद मैदानावर उपोषण करावे लागते हे त्यांच्यासाठी हास्यास्पद असून अपयशी ठरल्याची पावतीच त्यांनी दिल्याची टीका महिला काँग्रेसने केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी भाजपवर टीका केली. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी त्या  खासदारांची परिस्थिती असून त्यांनी गोव्यासाठी काहीच केलेले नाही आता लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांना जाग आली असून उपोषणाचे नाटक ते करीत आहेत. आंदोलनाचा तमाशा करीत असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.