काँग्रेसचे सरकार आल्यास गिरीश मुख्यमंत्री:खलप

0
1048

पणजी आणि वाळपई पोटनिवडणुकां मध्ये गिरीश चोडणकर आणि रॉय नाईक निवडून येणार आहेत.त्यानंतर काँग्रेसचे सरकार बनणार असून प्रसंगी गिरीश चोडणकर सुद्धा मुख्यमंत्री बनू शकतील असे काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
खलप म्हणाले,लोकशाही पायदळी तुडवून सरकार बनवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही.पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप सरकार विरोधात असलेला अंडर करंट स्पष्टपणे जाणवत आहे.जे सायलेंट मतदान होईल त्यात काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा दावा खलप यांनी केला. लोकशाही जतन करण्यासाठी काँग्रेस उमेदवारांना विजयी करा असे आवाहन खलप यांनी केले.
महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतींन्हों यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गणेशोत्सवात टॉमेटो महाग असल्याने कांदे खा असा सल्ला दिल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पर्रिकर यांनी गणेश भक्तांची थट्टा करत असल्याचा आरोप करत कुतींन्हों यांनी लोकांनी आता महागाई मुळे सगळ खायचे सोडून मोदी आणि पर्रिकर यांची पोकळ आश्वासने खावून पोट भरायची का असा सवाल उपस्थित केला.