काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन

0
1107
गोवा खबर:काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मडगाव मधील हॉस्पिटल मध्ये निधन झाले.ते 72 वर्षाचे होते.आज सकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना मडगाव येथील त्रिमूर्ति हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.नाईक यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या कुंकळ्ळी येथील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नाईक हे एकदा उत्तर गोवा लोकसभा खासदार तर 2 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.राज्यसभा सदस्य म्हणून  कारकिर्द संपल्या नंतर त्यांच्याकडे पक्षाने गोवा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती.राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर तरुणांणा संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन गिरीश चोडणकर यांच्यासाठी मार्ग मोकळा केला होता.राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी संसदेच्या समित्यांवर काम केले होते.नाईक यांच्या निधना बद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.