काँग्रेसचे जात कार्ड पणजीत चालणार नाही:दामू नाईक

0
947
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यावर आणि तळमळीवर गोमंतकीयांचा पूर्ण विश्वास आहे.पणजीवासीय त्याला अपवाद नाहीत.पर्रीकर आणि भाजप ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहेत.त्यामुळे विरोधक जात कार्ड वापरत आहेत मात्र ते पणजीत बिलकुल चालणार नाही असा दावा माजी आमदार दामू नाईक यांनी आज पणजी येथील प्रचार सभेत केला.पर्रीकर यांनी जात किंवा धर्म असा भेदभाव कधीच केला नाही.सबका साथ सबका विकास हेच भाजपचे धोरण असून पर्रीकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे नाईक यांनी सांगितले.पर्रीकर यांनी त्यापूर्वी पणजी येथील भाजप कार्यालयात महिला स्वयंसहाय्य गटांशी संवाद साधत महिलांना स्वयंपूर्ण करण्यावर आपला भर असणार असल्याचे स्पष्ट केले.पणजी,रायबंदर
 येथील संवाद सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असून पणजीवासीय पर्रीकर पुन्हा पणजीचे आमदार बनणार म्हणून खुश असल्याचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान पर्रिकर यांनी आज प्रथमच माजी आमदार बाबुश मोन्सेरात गटाच्या 20 नगरसेवक आणि महापौरांसोबत बैठक घेऊन पणजीच्या विकसासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
पणजी:मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यावर आणि तळमळीवर गोमंतकीयांचा पूर्ण विश्वास आहे.पणजीवासीय त्याला अपवाद नाहीत.पर्रीकर आणि भाजप ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहेत.त्यामुळे विरोधक जात कार्ड वापरत आहेत मात्र ते पणजीत बिलकुल चालणार नाही असा दावा माजी आमदार दामू नाईक यांनी आज पणजी येथील प्रचार सभेत केला.पर्रीकर यांनी जात किंवा धर्म असा भेदभाव कधीच केला नाही.सबका साथ सबका विकास हेच भाजपचे धोरण असून पर्रीकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे नाईक यांनी सांगितले.पर्रीकर यांनी त्यापूर्वी पणजी येथील भाजप कार्यालयात महिला स्वयंसहाय्य गटांशी संवाद साधत महिलांना स्वयंपूर्ण करण्यावर आपला भर असणार असल्याचे स्पष्ट केले.पणजी,रायबंदर