कळंगुट मध्ये 1 लाख रूपयांचे ड्रग्स जप्त

0
1071

गोवाखबर:कळंगुट पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत प.बंगाल मधील गोकुळ मायटी या युवकाला 1 लाख 5 हजार रूपयांचे हेरॉइन आणि गांजा बाळगल्या प्रकरणी अटक केली.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ हा कळंगुट मधील सेंट अन्थोनी चॅपेलकडे आज सकाळी ड्रग्स विकण्यासाठी येणार होता.
पोलिस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमुन सापळा रचण्यात आला.गोकूळ हा चॅपेलकडे पोचताच पोलिसांनी गोकूळला घेरुन ताब्यात घेतले.त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 80 हजार रूपयांचे हेरॉइन आणि 25 हजार रूपयांचा गांजा सापडून आला.आज पहाटे 4 ते सकाळी 6 दरम्यान ही कारवाई करण्यात आली.गोकुळ विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये पोलिस निरीक्षक दळवी,पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर,पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर,वल्लभ पेडणेकर सहभागी झाले होते.