कळंगुट मध्ये गांजा बाळगल्याप्रकरणी बंगाली सद्दामलाअटक

0
1332
गोवा खबर : गांजा बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी आज पश्चिम बंगाल येथील एकास अटक केली.
सद्दाम हुसेन मौला (२६, दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल)असे संशयिताचे नाव असून त्याला कळंगुट बाजारातून अटक करण्यात आली. 
कळंगुट-नायकावाडो येथे एकजण अमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती
पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांना खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सपना गवस आणि सहकाऱ्यांनी सापळा रचला होता. संशयित तेथे दाखल झाला होताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे  २४ हजार रुपये किंमतीचा गांजा सापडला. सकाळी ९.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.
महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गवस, कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर, वल्लभ पेडणेकर,  विनोद केरकर आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. कळंगुटचे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक करत आहेत.