कळंगुट मध्ये उत्तर प्रदेशच्या 2 मोबाइल चोरांना अटक

0
1043
 गोवा खबर:मोबाइल चोरीत गुंतलेल्या दोघांना आज कळंगुट पोलिसांनी अटक केली.24 नोव्हेंबर रोजी झालेल्या मोबाइल चोरीत या दोघांचा हात असल्याचे आढळून आले आहे.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहीती नुसार हरयाणा येथील संतोष यादव यांनी  आपली पर्स चोरीस गेली असून त्यात मोबाइल आणि इतर सामान असल्याची तक्रार नोंदवली होती.कळंगुट पोलिस त्याचा तपास करत असताना हे दोन्ही चोरटे त्यांच्या हाती लागले.
पोलिसांनी मोबाइलचे लोकेशन तपासले असता मोबाइल बागा येथे वापरला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या तपासात हा फोन उत्तर प्रदेश येथील हूमेंदुरहमान हुसेन हा वापरत असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.पोलिसी खाक्या मिळताच हुसेन याने आपल्या साथीदाराचे नाव उघड केले.त्यानुसार पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील हरीगोपाळ पाठक याला देखील अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून 20 हजार रुपयांचा रिडमी कंपनीचा मोबाइल जप्त करण्यात यश मिळवले आहे.याचोरीत दोघांना अटक करण्यात आली असून यात आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास कळंगुट पोलिस करत आहेत.